Principal's Message
About Institute / Principal’s Message
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षामध्ये “केंद्रीभुत विद्यार्थी” शैक्षणिक गुण आगि राष्ट्रबांधणीसाठी महाविद्यालय आप्रही आहे.
महाविद्यालयामध्ये मानव्यविद्याशाखा पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्याच्यांची संख्या शालागणिक वाढत असुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृध्दीसाठी सुध्दा महाविद्यालय प्रयत्नशिल आहे. अध्ययन, विस्तार सेवा व संशोधन कार्यावर विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून महाविद्यालय कार्यरत आहे.
सत्र २०२२-२३ मध्ये प्रथम सत्रामध्ये अध्ययन कार्यपुर्ततेशिवाय अंतर्गत परीक्षा व विद्यापीठ स्तरीय परीक्षा सुरु असुन विषयनिहाय पाठ्यक्रमाच्या आधारे वर्गनिहाय व विषयनिहाय गुणवत्ता पृष्टीसाठी शिक्षकवर्ग सातत्याने प्रयत्नरत आहे. शैक्षणिक सत्र २३-२४ पासुन नविन शैक्षणिक धोरणानुसार आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन विचारामध्ये घेऊन श्रेयांक आधारित पध्दतीनुसार (CBCS) अध्ययनकार्य होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या अध्ययन सोबतच विषयाधारीत गटचर्चा, चर्चासत्र, निबंधलेखन, सेमिनार सादरीकरण, शैक्षणिक सहल इत्यादि उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढविण्यावरप्राधान्यक्रम देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने व्यक्तीमत्व विकास प्रक्रियेसंबंधीविविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येतो. शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालय, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहे.
योगासने, वृक्षारोपण व संवर्धन, पर्यावरण संतुलन, परिसर स्वच्छता व परिसर सौंदर्याकरण, जलसंधारण, दंततपासणी, नेत्रतपासणी, ग्रामसभा अवलोकन, ग्रामीण जनजागरण शिबीर, प्रकल्प भेट, निमंत्रित तज्ज्ञांचे व्याख्यान इत्यादि उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात येत आहे.
पीएचडी रिसर्च सेंटर अंतर्गत राज्यशास्त्र, मराठी, भूगोल, अर्थशास्त्र आणि गृहअर्थशास्त्र विषयामध्ये संशोधनाचे कार्य सुरु आहे. वैश्विक पातळीवर विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकुन रहावा याची काळजी या व्यवस्थेचा जोखिमदार घटक म्हणून महाविद्यालय घेत आहे.
आयक्यूएसी सेलच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वृध्दी व शैक्षणिक गुणवत्ता अंकेक्षण कायम ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. त्या दृष्टीने महाविद्यालयातील शिक्षकांचा अध्ययन, अध्यापनासोबतचे संशोधन कार्यावर भर असतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कला व वाणिज्य
विद्याशाखेच्या अभ्यासकेंद्रामध्ये विद्यार्थी प्रवेशित झाले असुन केंद्र संयोजक, केंद्र समन्वयक आणि केंद्र
प्रवर्तक वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तत्पर आहेत.
महाविद्यालय विकास समितीच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जाणारे दिशादिग्दर्शन व प्रोत्साहन यामुळे महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दिशेने करीत असलेली वाटचाल महत्वाची वाटते.
धन्यवाद !
डॉ. पी. एच. सूर्यवंशी